‘एकदम 11 वर्ष मागे गेल्यासारखं…’; ‘उंच माझा झोका’मधील छोट्या रमाबाईंची व्हिडीओ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी अशी वाहिनी आहे त्यावरील जवळपास सर्व मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यातील काही मालिका तर इतक्या गाजल्या कि आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यांपैकी एक म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘उंच माझा झोका’. ही मालिका तेव्हा फारच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर उलघडण्यात आला. या मालिकेतील सर्व कलाकारांचे विशेष कौतुक झाले.

‘उंच माझा झोका’ या मालिकेत नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, कविता लाड, ऋग्वेदी प्रधान, स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, शर्मिष्ठा राऊत अशी सरस स्टारकास्ट होती. तर रमाबाई रानडे यांची लहानपणीची भूमिका बाल कलाकार तेजश्री वालावलकरने साकारली होती. तेव्हाची बालकलाकार आता बरीच मोठी झाली आहे. या मालिकेला बंद होऊन अनेक वर्ष उलटल्यानंतर नुकतीच तेजश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘उंच माझा झोका’च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या व्हिडिओत तेजश्रीने नऊवारी साडी परिधान केल्याचे आपण पाहू शकतो. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘अकरा वर्षांनी पुन्हा एकदा नऊवारी नेसून तयार झाले. तयार झाल्यावर माझ्यासोबत लोकेशनवर असलेल्या प्रत्येकाच्या ओठात उंच माझा झोकाच गाणं आलं आणि ते गुणगुणायला लागले. जणू एकदम ११ वर्ष मागे गेल्यासारखं वाटायला लागलं आणि सर्वांच्या मनात असलेल उंच माझा झोकाच अढळ स्थान आणि प्रेम हे ११ वर्षांनी कदाचित तेवढ्याच किंवा त्या पेक्षा ही जास्त पटीने वाढलंय अस जाणवलं. माझ्यासोबत असलेल्यांनी लगेच दोन्ही व्हिडिओ एकत्र करून हा सुंदर प्रवास टिपला’.