‘आधी ह्याच्या सारख्यांना कापलं पाहिजे…’; बाप्पा जोशींच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी हे यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून काय प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या दमदार अभिनयाचा ठसा त्यांनी कलाविश्वात उमटवला आहे. इंडस्ट्रीत त्यांना प्रेमाने बाप्पा म्हणून हाक मारली जाते. गेल्या काही काळापासून बाप्पा सोशल मीडियावर फार सक्रिय दिसत आहेत. इतकंच नव्हे तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत किस्से आणि अनुभव देखील शेअर करताना दिसत आहेत. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फेसबुक पोस्टने आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता विद्याधर जोशी यांनी या पोस्टमध्ये त्यांना वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका अनुभवाचा उलगडा केला आहे. हि पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं कि, ‘गेली दोन- तीन वर्ष तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची होती. ती आज दत्त जयंतीच्या निमित्ताने करतो… मी राहतो त्याच्या पलीकडे दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी दरवर्षी २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, शिवजयंती (वर्षातून दोनदा), दत्त जयंती, हनुमान जयंती, कृष्णजन्म, राम जन्म (हा अलीकडे जोरात) आणि इतरही काही दिवशी सत्यनारायणाची महापूजा होते. लाऊडस्पीकरवरून मुलायम आवाजात मोठ्यांनी पूजा सांगितली जाते. त्याचा मला पूर्वीपासून त्रास व्हायचा. तो मी बोलूनही दाखवायचो.. पण गेली काही वर्ष तो बोलून दाखवला तर माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही आणि पर्यायाने इतर प्रकारचा द्रोही ह्या नजरेने बघायला लागले आणि आधी ”ह्याच्या सारख्यांना कापलं पाहिजे” असं काहीसं म्हणायला लागले!!’

‘मी काय आयडिया केली, गेली दोन- तीन वर्ष मी याच दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायला लागलो. सार्वजनिक पूजेच्या तिकडचा भट (किंवा भटजी, गुरुजी) याच्या पूजा सांगण्यावरूनच मी माझ्या घरी पूजा करायला लागलो!! मुलाला ते पूजा सांगणारे कधी येतायेत याच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि ते आले की तो मला लगेच फोन करतो.. मी लगेच बसतो आणि पूजा त्यांच्या क्लाऊड स्पीकर वरून येणाऱ्या सूचना बहुकूम पूजा करून घेतो!! हल्ली माझ्याबद्दलचा आदर समाजात वाढलेला दिसतो. ह्यावर्षी मला चौथीपर्यंतच्या मुलांच्या घेतलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरक म्हणून बोलावंल आहे. (वाचलेले दक्षिणेचे पैसे साठवून निदान पूजा सांगणाऱ्यांकरता योग्य प्रकारे आरत्या म्हणण्याचे आणि लाऊड स्पीकर चालवणाऱ्यांकरता साऊंड इंजिनिअरिंगचे वर्ग सुरू करावेत असं मनात आहे. त्याची एक शाखा मशिदीतल्या लाऊड स्पीकरवाल्यांकरता ही पुढे मागे चालू करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी देणगी देण्यास हरकत नाही. फक्त ती रुपये पाच हजार आणि त्याच्या पटीत असावी.) बाप्पा जोशींची हि पोस्ट तुफान व्हायरल झाली असून यावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या आपापले मत प्रकट करताना दिसत आहेत.