हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. गौतमी नुकतीच तिचा प्रियकर स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न बंधनात अडकली आहे. २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी आणि स्वानंदचा विवाह सोहळा दणक्यात पार पडला. लग्नाआधीच्या विधींपासून ते रिसेप्शनपर्यंत प्रत्येक विधीचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दरम्यान अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर एक फोटो शेअर केला आहे. जो प्रचंड चर्चेत आला आहे. या फोटोत तिने लग्नानंतर झालेली स्वतःची अवस्था दाखवली आहे. गौतमीने इंस्टाग्राम हँडलवर स्टोरी पोस्ट करताना शेअर केलेल्या फोटोत ती विक्ट्रीच साइन करताना दिसत आहे.
तसेच तिच्या डोळ्याखाली अन्डर आय पॅचेस लावलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना गौतमीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘लग्नानंतरचा परिणाम’. तिचा हा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर आता स्वानंदची एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
गौतमीचा नवरा स्वानंद तेंडुलकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये हि पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये स्वानंदने बायको गौतमीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघं फिरायला जाताना दिसत आहेत. या फोटोत गौतमी हसताना दिसतेय. यावर स्वानंदने लिहिलंय कि, ‘माफ कर. पण मी माझा स्नॅक्स तुझ्याबरोबर शेअर करू शकत नाही. बायको असशील घरी…’. स्वानंदची ही मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याशिवाय त्याने बायकोसोबतच्या पहिल्या वीकेंडच्या ट्रीपचे बरेच फोटो स्टोरीवर शेअर केले आहेत.