‘गुलाब, केक आणि फुग्यांनी सजवलेली होडी..’; श्रेया बुगडेने पतीसोबत ‘अशी’ साजरी केली ऍनिव्हर्सरी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. श्रेयाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस झाला आणि यानिमित्त श्रेयाला तिच्या नवऱ्याने खास सरप्राईज दिल आहे.

श्रेया आणि तिचा पती निखिल यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा नववा वाढदिवस एकदम जंगी साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त निखिलने श्रेयाला खास सरप्राईज दिले होते. एका yachtवर दोघांनी रोमँटिक पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा कला. नवऱ्याने दिलेलं हे खास सरप्राईज श्रेयाने फारच एन्जॉय केलं. या खास सेलिब्रेशनचे फोटो तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये श्रेया आणि निखिल एकत्र त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

या खास सेलिब्रेशनसाठी निखिलने एक संपूर्ण होडी (yacht) फुग्यांनी सजवली होती. श्रेयाला लाल गुलाबांचा गुच्छ भेट म्हणून दिल्यानंतर दोघांनी एकत्र ब्लु बेरी केकसुद्धा कापला. अत्यंत शांत वातावरणात दोघांनी एकमेकांसाठी वेळ देत आपला खास दिवस साजरा केला आहे. श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने नवऱ्यासोबत काही रोमँटिक पोज दिल्याचे दिसत आहे. श्रेयाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून यावर नेटकरी, चाहते आणि सेलिब्रिटी मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.