हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा संतोष सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि कामाचे अपडेट देण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. नुकतीच त्याने आई- वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसोबत त्याने लिहिलेल्या कॅप्शनने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या पोस्टमध्ये संतोषने आई- वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिलं, ‘काल आई- बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आज मी post share करतोय, कारण मला हवा तसा फोटो सापडत नव्हता आणि आज सापडला आणि त्यांचा हा फोटो मला खूप आवडलाय. आईने काल बाबांना smart phone gift केला आणि ती त्यांना तो कसा वापरायचा हे शिकवत होती आणि बाबा आईचं नीट लक्ष देऊन ऎकत होते. अगदी असंच ते लग्न झाल्यापासून आईचच लक्ष देवून ऎकत आले आहेत, म्हणून आजही सुरक्षित आणि उत्तम आयुष्य जगतायत’.
पुढे लिहिलंय, ‘आईने काल तिची लग्नातली आठवण share केली. तिने सांगितलं, लग्न झाल्यावर सासरी जाताना तिची आई म्हणाली होती, “आता तू आमची राहिली नाहीस; आता तू, तुझा संसार, तू सांभाळ खंबीरपणे. आई- बाबा मला तुमचा खूप अभिमान आहे, तुम्ही दोघांनी करून दाखवलंत; लढलात, पडलात, पुन्हा लढलात, तुम्ही तुमच्या संसारासाठी अगदी आमच्यासकट जे केलं आहे ते खूप अमूल्य आहे आणि तुमच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण आम्हाला कायम राहो, हाच तुमचा आणि देवाचा आम्हाला आशीर्वाद लाभूदे I love u lottttttt नांदा सौख्यभरे’.