‘जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…’; क्षितीच्या वाढदिवशी हेमंतची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील पावर कपल म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांची विशेष ओळख आहे. हेमंत आणि क्षिती दोघेही उत्तम कलाकार, दमदार दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. सोशल मीडियावर हे कपल कायम चर्चेत असतं. दोघेही आपापल्या कामात अव्वल असताना अनेकदा एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. माध्यम कोणतेही असो हेमंत आणि क्षिती आवर्जून एकमेकांचे कौतुक करतात. आज क्षिती जोगचा वाढदिवस आणि यानिमित्त हेमंत ढोमेने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने क्षिती जोगचा फोटो पोस्ट करत तिच्यासाठी एक खास बर्थ डे पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने सोशल मीडियावर शेअर केलेला क्षितीचा हा फोटो ‘झिम्मा 2’च्या शूटिंग दरम्यानचा आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये हेमंतने लिहिलंय, ‘या फोटोतलं हसू कायम असंच राहूदे!! आपल्या लाईफची एनर्जी!! जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! गेलं वर्ष तर तू गाजवलंस, असंच कमाल काम करत रहा… येणारं वर्ष सुद्धा तुला जे हवं ते देईल! Love you…’.

हेमंतने म्हटल्याप्रमाणे २०२३ हे वर्ष खरोखरचं क्षिती जोगने गाजवलं. कारण २०२३ मध्ये क्षितीने करण जोहर दिग्दर्शित आणि आलिया भट – रणवीर सिंग अभिनित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या हिंदी सिनेमात महत्वाची भूमिका साकारत सर्वांचे मन जिंकले. या सिनेमात तिने रणवीर संक्रात असलेल्या रॉकी रंधावाच्या आईची भूमिका साकारली. याशिवाय हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’मध्ये तिने साकारलेली मिता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.