‘एक्स्ट्रा मेहनत – एक्स्ट्रा हिम्मत – एक्स्ट्रा..’; उत्कर्ष शिंदेने 2023 मधील आठवणींना उजाळा देत शेअर केली व्हिडीओ पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघता बघता २०२३ हे वर्ष संपलं. काही चांगल्या तर काही वाईट आठवणींसोबत २०२३ या वर्षाने बऱ्याच लोकांना काही शिकवलं तर काहींना घडवलं. एकंदरच या वर्षात दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे अनुभव गाठीशी आले. अखेर २०२३ संपलं आणि सुरु झालं २०२४. या नव्या वर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद आणि नव्याने प्रत्येकाची धडपड सुरु झाली आहे. नववर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी पोस्ट शेअर केल्या. यामध्ये अभिनेता उत्कर्ष शिंदेचा देखील समावेश आहे. त्याने २०२३ मधील सर्व आठवणी एकत्र करत एक पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल झाली आहे.

अभिनेता उत्कर्ष शिंदेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि न्यू इयर पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्यामध्ये त्याने २०२३ वर्षातील सर्व आठवणींना एकत्र केलं आहे. यामध्ये त्याने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक चांगले प्रसंग, आठवणी एकत्र करून एक व्हिडीओ तयार केला आहे. सोबत कॅप्शन लिहिताना त्याने आवर्जून त्याचं २०२३ हे वर्ष सुंदर आणि आनंददायी बनवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. या व्हिडिओसाठी बॅकग्राऊंडला ‘हर घडी बदल रही है…’ या गाण्याची धून वापरली आहे.

तसेच या पोस्टसोबत उत्कर्षने कॅप्शमध्ये लिहिलंय कि, ‘३६६ दिवस घेऊन येणारा वर्ष २४. एक्स्ट्रा मेहनत -एक्स्ट्रा हिम्मत -एक्स्ट्रा प्रेम -एक्स्ट्रा जिध -एक्स्ट्रा ऊर्जा बाळगून थोरा मोठ्यांचा आदर्श घेत विजयाच्या आनंदाचा हर्ष साजरा करत नवं उत्कर्षाकडे वाटचाल करूयात. प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आणि माझे 23’ वर्ष छान केल्याबद्दल धन्यवाद!!’ उत्कर्ष शिंदेची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. उत्कर्षच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.