हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रथमेश परब नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. ‘टाईमपास’ चित्रपटात त्याने साकारलेला दगडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रथमेशचा चाहता वर्ग बराच मोठा असून यामध्ये युथचा अधिक समावेश आहे. गेल्या महिन्याभरात अनेक कलाकार मंडळींनी लग्न उरकल्यानंतर आता प्रथमेश पारंबीची लगीनघाई सुरु झाली आहे. लवकरच प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे.
अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो आणि त्याने याच माध्यमातून आपल्या पहिल्या केळवणाचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रथमेश सोबत त्याची होणारी बायको म्हणजेच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरदेखील दिसते आहे. दोघांच्याही समोर गोडाधोडाच्या जेवणाचं ताट दिसतंय. बाजूला केळवणानिमित्त केलेली खास सजावट देखील दिसत आहेत.
या फोटोत प्रथमेश आणि क्षितिजाने गोड स्माईलसोबत खास पोज दिली आहे. हा फोटो प्रथमेश आणि क्षितीजा दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लग्नाची तारीख शेअर केल्याचे म्हटले आहे.
क्षितीजाने हा केळवणाचा फोटो शेअर करत त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ‘#प्रतिजाचं ठरलंय हा!! बाकी तारीख लवकरच कळवतो.. (PS- तारीख खूपच Special आहे!, Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा.) तोवर….. नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happppppy “2024”‘ क्षितिजाने लिहिलेलं कॅप्शन पाहता त्यामध्ये केवळ २०२४ असा उल्लेख केला गेला आहे.
यानुसार प्रथमेश आणि क्षितीजा हे दोघे फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न करणार असे बोलले जात आहे. तसेच तारीख खूपच स्पेशल आहे यावरून असा अंदाज लावला जातोय कि, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आता पक्की तारीख त्यांच्या अधिकृत घोषणेनंतरच समजेल.