Shivani Surve | ‘तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष’, इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे शिवानी सुर्वेच्या लग्नाच्या चर्चांना आले उधाण


Shivani Surve | सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. अनेक कलाकार एकापाठोपात एक लग्न करत आहेत. नुकतेच आनंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे यांचे लग्न झाले आहे. आणि अशातच अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या आहेत.

शिवानी सुर्वे मागील अनेक वर्षापासून अजिंक्य ननावरे त्याला डेट करत आहे. आणि ते लवकरात लग्न बंधनात अडकणार आहे अशी चर्चा सुरू आहे. अशातच शिवानीने अजिंक्य सोबत एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून शिवानीने “तुझी गर्लफ्रेंड म्हणूनही शेवटचं वर्ष” असं कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे आता हे दोघे लवकरच यावर्षी लग्न गाठ बांधणार आहे अशी चर्चा चालू आहे.

हेही वाचा – मी रडलो नाहीये अजून!! आस्ताद काळेला मातृशोक; शेअर केली भावूक पोस्ट

अजिंक्य हा देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो सातव्या मुलीचे सातवी मुलगी या मालिकेमध्ये काम करत आहे. याचप्रमाणे त्यांनी पावनखिंड या चित्रपटात देखील काम केले आहे. त्याचप्रमाणे शिवानीबद्दल बोलायचे झाले जर शिवानीने ‘देवयानी’ या मालिकेतून पदार्पण केले आणि त्या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने झिम्मा २ मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे.तसेच तिने वाळवी, ट्रिपल सीट, सातारचा सलमान या सिनेमांमध्ये काम केले आहे.