‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री रंगभूमी गाजवणार; ‘या’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचे कथानक सध्या अनोख्या वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले असून मालिकेतील कलाकारांनी देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर असे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यांपैकी एका अभिनेत्रीने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे.

मालिका विश्वातील अनेक कलाकार हे रंगभूमीवर कार्यरत आहेत. यातच आता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील एका अभिनेत्रीचा समावेश होतो आहे. होय. लवकरच या मालिकेत प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हि रंगभूमीवर पुनरागमन करताना दिसणार आहे.

याविषयी प्रियंकाने स्वतः अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. प्रियांका बऱ्यापैकी सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे याच माध्यमातून तिने याबाबत माहिती दिली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत खलनायिका ‘प्रिया’ हि भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ या नव्या नाटकात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या नव्या नाटकामध्ये प्रियांका तेंडोलकरसह ‘सुभेदार’ फेम अभिनेते अजय पुरकर, अतुल महाजन आणि आशिष पवार या जबरदस्त कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या नाटकाच्या स्क्रिप्टचा एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एक नवीन सुरुवात…गणपती बाप्पा मोरया’. या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह काही कलाकार मंडळींनी प्रियांकाला नव्या नाटकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.