हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाचा लाडका दगडू लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा लक्ष त्याच्या वेडिंग अपडेट्स वर आहे. अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत येत्या महिन्यात लग्न करणार आहे. सध्या दोघांच्याही केळवणाला सुरुवात झाली आहे. प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता केळवण स्टोरीज असे म्हणत प्रथमेशने व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होतो आहे.
अभिनेता प्रथमेश परबने स्वतःच्या केळवणाचा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘जेव्हा केळवणाला तुमच्यापेक्षा तुमचं कुटुंब जास्त उत्साहित असतं’. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला प्रथमेश आणि क्षितिजा घरात एंट्री करताना दिसत आहेत. दोघांच्या हातात हार्ट शेप लाल फुगा आहे. तर दोघांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केल्याचे दिसत आहे. यानंतर कुटुंबातील सदस्य दोघांना गोडधोड पंचपक्वान्नातील पदार्थ भरवताना दिसत आहेत. पुढे प्रथमेश आणि क्षितिजा कुटुंबियांसोबत मस्त डान्स करताना दिसत आहेत.
इतकेच काय तर या व्हिडिओत प्रथमेश आणि क्षितिजा रोमँटिक डान्स करताना देखील दिसत आहेत. गोडधोड जेवणासोबत प्रथेमश आणि क्षितिजासाठी खास केळवण असे लिहिलेला चॉकलेट केकसुद्धा अरेंज करण्यात आला होता. दोघांनी मिळून केक कटिंग केले आणि एकमेकांना केक भरवला. प्रथमेशच्या या खास केळवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता चाहत्यांना प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाची तारीख नेमकी काय..?याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान येत्या व्हॅलेन्टाईन्स डेला म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२४ रोजी हे दोघे लग्न करणार असल्याचा अंदाज तूर्तास वर्तवला जात आहे.