‘..आणि तुझ्यात मी हरवावे’; मालदीवच्या समुद्रकिनारी MHJ फेम चेतूचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक हास्यवीर प्रकाशझोतात आले. यांपैकी एक म्हणजे कधी गोड कधी तिखट चेतना भट. आजपर्यंत चेतनाने प्रत्येक स्किटमध्ये १००% चांगला अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. MHJ चे सगळेच कलाकार कायम शूटिंग आणि स्किट्सच्या प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असतात. म्हणूनच एक छोटासा ब्रेक घेत चेतना तिच्या पतीसोबत मालदीवला गेली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चेतना मालदीव डायरीस असे कॅप्शनमध्ये लिहीत अनेक फोटो तसेच व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. अशातच तिने नवऱ्यासोबत केलेलं रोमँटिक फोटोशूट शेअर केलं आहे. चेतना तिचे पती मंदार चोळकरसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. चेतनाचा पती मंदार चोळकर हा प्रसिद्ध गीतकार आहे आहे आणि त्याने आपल्या नव्या गाण्याची माहिती देताना त्यांचा मालदीवमधील रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. जो फारच गोड आहे.

मालदीवच्या समुद्रकिनारी गुलाबी वातावरणात चेतना आणि मंदार एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दरम्यान त्यांनी केलेलं रोमँटिक फोटोशूट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोशूटसाठी दोघांनीही मॅचिंग पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. या फोटोंमध्ये चेतनाने शुभ्र पांढऱ्या रंगाचे फ्रॉक तर तिला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्याचे दिसत आहेत. दोघांचेही हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून यावर नेटकरी व कलाकार मंडळी कमेंट करताना दिसत आहेत.