रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये झळकणार मराठमोळे कलाकार; समोर आली पहिली झलक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात भाषेचा आणि मनोरंजनाचा मोठा संबंध आहे. ज्या प्रेक्षकांची जी भाषा त्यामध्ये त्यांचे मनोरंजन करणे हि मोठी जबाबदारी कलाकारांवर असते. हि जबाबदारी प्रत्येक भाषेतील कलाकार व्यवस्थित पार पाडत असतात. अशातच पंख विस्तारात हे कलाकार इतर भाषांमध्ये काम करून त्यांचा चाहता वर्ग वाढवताना दिसतात. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी हिंदी तसेच दाक्षिणात्य भाषांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्येही अनेक मराठी कलाकारांची एंट्री झाल्याचे समोर आले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी हा बॉलिवूड सिनेविश्वातील ऍक्शन डिरेक्टर म्हणून ओळखला जातो. हिंदी सिरीज किंवा चित्रपटांमध्ये ऍक्शन अंदाज दाखवत प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही नवीन वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या नव्या सीरिजची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. कारण या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. अशातच जेव्हा या सीरिजचा ट्रेलर समोर आला तेव्हा समजले कि यामध्ये अनेक मराठी कलाकार देखील म्हत्वाच्याबी भूमिकांमध्ये आहेत.

‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यामध्ये काही मराठी कलाकारांची झलक दिसून आली. ज्यामध्ये अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, वैदेही परशुरामी आणि शरद केळकर या मराठी कलाकारांचा समावेश आहे. याआधी रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’, ‘सिंबा’ या सिनेमांमध्ये मराठी कलाकार झळकले होते. ‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर ३ मिनिटांचा आहे. माहितीनुसार हि सीरिज येत्या १९ जानेवारी २०२४ पासून अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.