‘मला जर एका पुरुषाची गरज..’; मराठी अभिनेत्री श्रुती मराठेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेली अभिनेत्री श्रुती मराठे ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या अभिनयामुळेच नव्हे तर सौंदर्यामुळे श्रुतीचे लाखों चाहते आहेत. मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमातून श्रुतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. मराठी, तमिळ, कन्नड, हिंदी भाषांमध्ये काम करताना श्रुतीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आणि तिची निर्मिती असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. दरम्यान श्रुती तिच्या एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आली आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे हि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे त्यामुळे तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान एका मुलाखतीत अभिनेत्रीने केलेले एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले आहे. अलीकडेच एका प्रसिद्ध युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ या कार्यक्रमात अभिनेत्री श्रृती मराठे सहभागी झाली होती. यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्याची तिने चोख उत्तरे दिली. दरम्यान तिला विचारण्यात आलं की, खऱ्या आयुष्यात स्त्री म्हणून श्रृती मराठेला काय वाटतं की, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये एखादा पुरुष यावा लागतो तेव्हाच त्याचं आयुष्य कलरफुल होईल..?

या प्रश्नाचं उत्तर देताना श्रुतीने म्हटले कि, ‘मला वैयक्तिक असं वाटत नाही. म्हणजे तो काय उद्देशाने तुमच्या आयुष्यात येतोय, याचाबद्दल तुम्ही खूप क्लिअर असायला लागतं. मला असं वाटतं, तुमच्याशिवाय इतर कोणीही तुम्हाला पूर्ण करू शकत नाही. कोणीतरी तुमचं आयुष्य असं छान वर्तुळामध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरुषाची गरज नसते. मला जर एका पुरुषाची गरज किंवा लग्न करावसं वाटलं की एक नवरा माझ्या आयुष्यात मला हवासा वाटला. तर एक सोबती म्हणून हवाय. मला त्याची गरज आहे किंवा त्यांनी माझं आयुष्य पूर्ण करावं म्हणू नको. पण त्याने माझी साथ द्यावी, मी त्याची साथ द्यावी म्हणून मला हवाय’. श्रुतीच्या या वक्तव्याला अनेक स्त्रिया आणि तरुणींनी समर्थन दिले आहे.