Mukta Barve | ‘काही प्रेमकथा मर्डरने सुरू होतात’, मुक्ता बर्वेचं भयानक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत


Mukta Barve | मराठी नाटक मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे होय. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केलेली आहे. मुक्ताही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि बऱ्याच वेळा तिच्या पोस्ट मधून ती चर्चेचा विषय बनत असते. अशातच तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच वायरल होताना दिसत आहे.

मुक्ता बर्वे हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने सुपरहिट हिरो डेडपूल सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आणि ती त्याच्यावर रागवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून दिले कॅप्शन दिले आहे की, “काही सर्वोत्कृष्ट प्रेम कथा मर्डरने सुरू होतात डेडपूल आमच्या तर फक्त भांडण सुरू झाले.” तिने शेअर केलेले हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आणि तिच्या चाहते या पोस्टला खूप प्रेम देखील देत आहे.

हेही वाचा – ‘मुंबई मराठी माणसाच्याच बापाची..’; पुष्कर जोगने मांडलं रोखठोक मत

तिच्या या फोटोवर एका युजरने कमेंट केली आहे की, “डेडपूलला टशन देण्याची हिंमत तुझ्यातच आहे.” तर दुसऱ्या एका युजरने दिली आहे की, “मुक्ता बी लाईक अरे वेड्या चार चौकी बघितलेस का तुझ्यापेक्षा भारी आमची रोहिणी मावशी आहे. अशाप्रकारे अनेकजन तीच्या या पोस्टवर कमेंट करून प्रतिसाद देत आहे.

मुक्ता सध्या चार चौघी या नाटकात काम करत आहे. या नाटकात तिच्यासोबत पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम हे कलाकार आहेत. याशिवाय तिने या आधी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे.