‘फोटोसाठी उधार घेतलेल्या..’; कुशल बद्रिकेने शेअर केली प्रार्थनासाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचा नुकताच वाढदिवस झाला. प्रार्थनाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मंडळींनी विविध पोस्ट शेअर करीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यातील बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टचा समावेश आहे. यामध्ये कुशलने प्रार्थनासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केले आहे आणि इथेच त्यांची मैत्री झाल्याचे त्याने सांगितले आहे.

कुशलने हि पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि, ‘आपली मैत्री सुरू झाली ती फोटोसाठी उधार घेतलेल्या तुझ्या trolley bag पासून का मग.. London मधे तू पाजलेल्या पहिल्या black- coffee पासून… छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, “तू” दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने dop म्हणून काम केलेल्या “reels” पासून. ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे, संजू दादा अश्या कलाकारांनी career ला जरासं statue देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला’.

पुढे लिहिलंय, ‘आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ”मधे नसून “instaच्या रील”मधे आहे हा शोध तुझाच. (wow मला काय वाक्य सुचलंय बघ! आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी reel करू यार) तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार. मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेंव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला happy birthday आणि खूप प्रेम’. कुशलच्या या पोस्टवर प्रार्थनाने हार्ट ईमोजी शेअर केला आहे.