Kiran Mane | आता जाळ अन् धूर संगटच! किरण मानेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षात केला प्रवेश


Kiran Mane | बिग बॉस मराठी या शो मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. ते सध्या कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून उदयास आले आहे. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कला विश्वामध्ये तर ते सुपरहिरो आहेतच.परंतु आता किरण मानेने राजकारणात एन्ट्री केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये किरण माने यांनी शिवसेना म्हणजे ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. आणि हाती शिवबंधन बांधून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात l.त्यांच्या या पोस्टमुळे अनेकवेळा त्यांना टीकेला देखील सामोरे जावे लागते. परंतु ते त्यांचे मत नेहमीच परखडपणे मांडताना दिसत असतात.

हेही वाचा – ‘फोटोसाठी उधार घेतलेल्या..’; कुशल बद्रिकेने शेअर केली प्रार्थनासाठी खास पोस्ट

त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर किरण माने म्हणाले की. “शिवसेना सामान्य माणसाला कुठून कुठे नेऊन ठेवते हे खरच आहे एक मी एक सामान्य घरातील माणूस आणि कलाकार आहे. अनेकांना माझ्या या भूमिकेचा आश्चर्य वाटलं असेल, कित्येकांच्या मनात शंका असेल मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आहे, आणि कायम राहील. शाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो. आता अचानक ही राजकीय भूमिका का घेतली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.पण आजच्या परिस्थितीत वातावरणाचे गढूळ झाले असताना संविधान वाचवण्यासाठी एकमेव माणूस लढत आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे. संवेदनशील कलाकारांनी भारताचा नागरिक म्हणून मी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जी काही जबाबदारी देईल ती मी मनापासून पार पाडेल.”

किरण माने यांनी काही मालिकांमध्ये काम केले आहे.याआधी त्यांनी मुलगी झाली हो, सिंधुताई सपकाळ याची मालिकांमध्ये काम केले आहे. आता राजकारणात आल्यानंतर किरण माने काय नवीन पावलं उचलणार आहेत याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष आहे.