Bhagya Dile Tu Mala | ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत विदिशा म्हसकरची एंट्री, मालिकेला येणार नवे वळण


Bhagya Dile Tu Mala | भाग्य दिले तू मला ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या चांगलीच रंगात आली आहे. मालिकेला एक रंजक वळण आलेले आहे. घरात झालेल्या वादामुळे रत्नमाला मोहिते कावेरी आणि राजवर्धन यांना त्यांचे राहते घर सोडावे लागले आह. तर एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या बिजनेस देखील सोडावा लागलेला आहे. या मालिकेत एवढं सगळं चालू असताना या मालिकेत आता एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत अभिनेत्री विदिशा म्हसकरची एन्ट्री होणार आहे. या मालिकेमध्ये ती एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. राजच्या हातातून सगळे गेल्यामुळे आता तो नवीन जॉबच्या शोधात आहे. त्यामुळे विदिशा नवीन जॉबच्या त्याच्या बॉसच्या भूमिकेत दिसत आहे.

या मालिकेत विदेशाने किमया ही भूमिका साकारली आहे. परंतु आता तिच्या येण्यामुळे राजवर्धन आणि कावेरी यांच्या नात्यावर परिणाम होणार आहे. असं या मालिकेचा प्रमुख पाहिल्यावर कळत आहे.

हेही वाचा – रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये झळकणार मराठमोळे कलाकार; समोर आली पहिली झलक

त्याचप्रमाणे विदिशा या मालिकेत नक्की सकारात्मक भूमिका साकारणार आहे की नकारात्मक याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या आधी विदेशाने रंग माझा वेगळा त्याचप्रमाणे 36 गुणी जोडी या मालिकेमध्ये नकारात्मक पात्र साकारले आहे. त्यामुळे आता या मालिकेत देखील तिचे काम असेच असेल असे सगळेजण अंदाज लावत आहे. त्याचप्रमाणे तिने बन मस्का आणि मन बावरे या मालिकेत देखील काम केले आहे.