बांदेकर कुटुंबीयांची आनंद यात्रा!! देवदर्शनासाठी केला ट्रेनचा प्रवास; साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे अत्यंत लाडके जोडपे आहे. त्यांची लव्ह स्टोरी आणि त्यांचा कलाविश्वातील प्रवास सगळ्यांनाच माहित आहे. आदेश बांदेकर हे महाराष्ट्रासाठी भावोजी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमधून प्रचंड नावलौकिक मिळवले आहे. त्यांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव सोहम आहे. अलीकडेच बांदेकर कुटुंबीय देवदर्शनासाठी गेले आहेत. ज्याचे फोटो आदेश यांनी शेअर केले आहेत.

नववर्षानिमित्त आदेश बांदेकर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत नुकतेच देवदर्शनाला गेले आहेत. ज्याचे फोटो त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरे, सेलिब्रिटी असूनही त्यांनी रेल्वेचा प्रवास करून देवदर्शनाला जाण्याचे ठरवले आणि दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बांदेकर कुटुंबीय रेल्वे प्रवास करून देवदर्शन केल्यामुळे त्यांच्या साध्या राहणीमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आदेश यांनी शेअर केलेल्या या फोटोत ते रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहताना दिसत आहेत.

आदेश बांदेकर यांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘प्रवास सहकुटुंब ट्रेनचा.. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर दर्शनाचा .. योग आनंदयात्रेचा…’. त्यांच्या या कॅप्शनमध्ये बांदेकर कुटुंबीयांनी कोणकोणत्या देवस्थानाला भेट देणार आहे.. हे स्पष्ट केलं आहे. यानंतर त्यांनी रेल्वेतून दिसणाऱ्या निसर्गाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. दरम्यान, आदेश बांदेकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या साधेपणाचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.