सालाबादप्रमाणे यंदाही…!! जागतिक योग दिनी प्राजक्ता माळीने घातले 108 सूर्यनमस्कार; व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामूळे आणि अप्रतिम हास्यामुळे नेहमीच सर्वांचे मन जिंकून घेते. शिवाय ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्ताच्या सुंदर दिसण्यामागे योगा हे एक महत्वाचे कारण आहे. प्राजक्ता नियमितपणे योगाभ्यास करते आणि आज तर जागतिक योग दिन असल्यामुळे तिने सालाबादप्रमाणे १०८ सूर्यनमस्कार घातले आहेत. इतकेच नाही तर तिने स्वतःसोबत चाहत्यांना देखील सूर्यनमस्कार करायला लावले आहेत. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

फिटनेस फ्रिक प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यायाम आणि योगाचे महत्व सांगत असते. अनेकदा ती योग करतानाचे व्हिडिओदेखील शेअर करताना दिसते. प्राजक्ता दरवर्षी जागतिक योग दिनी १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करते आणि तो पूर्णत्वासही नेते. आजही तिने १०८ सूर्यनमस्कार घालत योग्य दिन साजरा केला आहे. या विशेष विक्रमासाठी तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गेल्यावर्षीदेखील प्राजक्ताने हा विक्रम केला होता. हे सिद्ध करण्यासाठी तिने याचा खास व्हिडिओ शेअर करत एक खास कॅप्शन शेअर केले आहे, ‘सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी १०८ सूर्यनमस्कार घातले… त्याचा हा पुरावा… बाकी योग दिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा नाहीत..’. अभिनेत्री प्राजक्ता माळीने याबाबत कालच आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. ‘मी सकाळी ७ वाजता १०८ सूर्यनमस्कार घालायला येणार आहे, तुम्हीही या’, असे तिने म्हटले होते. यानुसार प्राजक्तासोबत अनेक चाहत्यांनी देखील सूर्यनमस्कार घालत जागतिक योग्य दिन साजरा केला आहे.