सागरने सईला दिलेल्या वाईट वागणुकीचा मुक्ता विचारणार जाब; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अलीकडेच सागर- मुक्ताचं लग्न पार पडलं. त्यामुळे चिमुकल्या सईची कस्टडी कोळी कुटुंबाला मिळाली. यामुळे मुक्ता, सागर, सईसोबत कोळी आणि गोखले कुटुंबीय आनंदात आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धनचा डाव पलटल्यामुळे तो नवी खेळी खेळताना दिसणार आहे. ज्याला सागर बळी पडून सागर त्याच्या लेकीला म्हणजेच सईला वाईट वागणूक देताना दिसणार आहे. यावर मुक्ता मात्र सईची आई म्हणून सागरला चांगलीच तंबी देताना दिसेल.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सईच्या येण्याने कोळी कुटुंब आनंद साजरा करताना दिसलं. तर मुक्ताने सईमध्ये केलेला बदल पाहून इंद्रा म्हणजे सागरची आई नाराज झालेली दिसली. मात्र घरातील इतर सदस्य मुक्ताने सईला आईसारखी वागणूक दिलेली पाहून आनंदी होताना दिसले. यानंतर सागरच्या मित्राच्या पार्टी हर्षवर्धन आणि सावनीने हजेरी लावल्याचे पहायला मिळणार आहे. दरम्यान दारूच्या नशेत असलेला सागर हर्षवर्धनचा खेळीला बळी पडतो. सागर नशेत असल्याचे पाहून हर्षवर्धन त्याला खोटं सांगतो की, ‘सई ही माझी मुलगी आहे. जरी ती तुझ्याकडे राहत असली तरी सई हर्षवर्धन अधिकारी आहे’. हे ऐकून सागर भडकतो आणि त्याला हि गोष्ट खरी वाटू लागते.

हर्षवर्धन आणि सागरचं बोलणं सावनी ऐकते आणि ती हर्षवर्धनला विचारते, ‘तू सागरबरोबर का खोटं बोललास?’ यावर तो म्हणतो, ‘हा तर माझा नवा डाव आहे’. हर्षवर्धनचं बोलणं ऐकून सागर मुक्ताला पार्टीत एकटचं सोडून घरी निघून येतो. तर मुक्ताला सावनी आणि हर्षवर्धन घरी सोडतात. सागर नशेत असताना सई त्याला विचारते की, ‘मुक्ता आई कुठे आहे?’ तेव्हा सागरला हर्षवर्धनने सांगितलेली गोष्ट आठवते आणि तो सईला जोरात ढकलून देतो. इतक्यात मुक्ता येते आणि सईला पडताना वाचवते. सागरचं वागणं पाहून मुक्ता भडकते आणि त्याला चांगलाच जाब विचारते. ती म्हणते, ‘माझ्या मुलीला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची..? माझ्या मुलीला हात जरी लावलात ना, तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईन’. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल इंडियावर व्हायरल होत आहे आणि यामुळे प्रेक्षकांची पुढील एपिसोड्सबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे.