Sankarshan Karhade | अभिनेता संकर्षण कराडे यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये एक स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. त्याच्या लेखणीतून त्यांनी त्याची जादू दाखवली आहे. संकर्षण हा एक खूप चांगला कवी देखील आहे. त्याने अनेक नाटक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. संकर्षण आता जरी मुंबईत राहत असला तरी गावाकडे असणाऱ्या लोकांचा त्याच्यावर प्रेम खूप आहे. अशातच अभिनेत्याने आता गावाकडच्या काही गोष्टी त्याच्या हातान सोबत शेअर केले आहे.
नुकतेच संकर्षण व्हाया स्पृहा या नाटकाचा प्रयोग परभणी मध्ये झाला. परभणीकरांनी त्यांच्या या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. एवढंच नाही तर संघर्षांचा अगदी सनई चौघडांनी स्वागत देखील करण्यात आलं. गावकऱ्यांचे हे प्रेम बघून संकर्षण अगदी भारावून गेला.
ही पोस्ट आणि सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की , “संकर्षण व्हासया स्पृहातचा कालचा परभणीचा प्रयोग हाउसफुल माझ्याच गावात माझ्या माणसांनी प्रेक्षकांनी सनई चौघडे वाचून स्वागत केलं खूप कौतुक केलं थँक्यू परभणीकर.”
हेही वाचा – ‘तुम्ही दिलेला शब्द पाळलात..’; प्रसाद ओकच्या नव्या घरी वास्तुशांती पूजेला CM एकनाथ शिंदेंची हजेरी
संघर्ष यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर कमेंट करून प्रेम व्यक्त करत आहे. परभणीतून संकर्षण हा मुंबई त्याचा करिअर करण्यासाठी आला आणि त्याने एक चांगले नाव मिळवले. आजपर्यंतचा त्याचा प्रवास सोपान होता तरी देखील त्याने तो पार केला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी हा संघर्षाचा डायलॉग खूप फेमस आहे. 2011 मध्ये आभास या मालिकेच्या माध्यमातून संघर्ष आणि अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
त्यानंतर त्याला अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये काम केलं मिळाले. त्याचप्रमाणे सध्या त्याच्या संकर्षण व्हाया स्पृहा, तू म्हणशील तसंच आणि नियम व अटी लागू या नाटकांचे प्रयोग चालू आहेत.