‘… म्हणून जगण्याला अर्थ आहे; MHJ फेम समीर चौघुलेंची ‘त्या’ चाहत्यासाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कलाकाराने अनेक विनोदवीरांना प्रकाशझोतात आणले. यामध्ये अभिनेता समीर चौघुले यांचाही समावेश आहे. हास्यजत्रेत विविध प्रहसन सादर करत हसत खेळत प्रेक्षकांना वेगवेगळे संदेश देणारा हा अभिनेता सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जे कलाकार आणि चाहत्यांना जोडण्याचे काम करते. त्यामुळे समीर चौघुले सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. दरम्यान त्यांच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात त्यांनी एका चाहत्याने दिलेल्या भेटवस्तूचा उल्लेख करत आपला अनुभव सांगितला आहे.

अभिनेता समीर चौघुलेंनी हि पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि, ‘हे असे चाहते आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे… लहानपणी माझ्या घराच्या भिंतीवर मी माझ्या आवडत्या हिरोंचे फोटो लावायचो… अमिताभ बच्चन, ब्रूस ली, जॅकी चॅन, पु.ल. देशपांडे, चार्ली चॅप्लिन (द कीड), कपिल देव यांचा (८३ चा वर्ल्ड कप उचललेला) असे अनेक फोटो माझ्या घराच्या भिंतीवर, गद्रेच्या लोखंडी कपाटावर असायचे..तेव्हा खरंच वाटलं नव्हतं कोणी माझा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर लावेल…. निखिल माने या माझ्या चाहत्याने माझ्या प्रेमापोटी माझे चित्र (हस्त आणि हसत चित्र) आपल्या घरातील भिंतीवर लावले आहे… माझ्यासाठी ही अत्यंतिक आनंदाची बाब आहे…’.

‘स्ट्रेस आणि नैराश्याने भरलेल्या जीवनात आपण नकळतपणे अनेकांच्या मनाला उभारी, positivity, आनंद मिळण्याचे निमित्त ठरतो ही गोष्ट कधी कधी गहिवरून टाकते… आणि चाहत्यांचं प्रेम गुदमरवून टाकतं… हास्याची ताकद किती मोठी आहे याची प्रचिती देणारी असंख्य उदाहरणे आम्ही हास्यजत्रेकरी रोज अनुभवतो… हे असे चाहते आणि त्यांचे प्रेम आमची कामाप्रती responsibility वाढवतात आणि विनोदाकडे जास्त गांभीर्याने पाहायला लावतात. प्रत्येक प्रहसनात ५०० टकके योगदान द्यायची उर्मी निर्माण करतात… प्रत्येक प्रयत्न सफल होतोच असं नाही.. कधी उन्नीस बीस होतंच… पण १०० टक्के प्रयत्न आणि मेहनत करण्यात आम्ही कधीच compromise करत नाही… हे संपूर्ण श्रेय आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाचे आहे… आणि आमच्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे .. तसेच सोनी मराठी या वाहिनीचे आहे… मी निखिल माने यांचे मनापासून आभार मानतो.. खूप खूप प्रेम!’