Sandip Pathak | संदीप पाठकच्या मानेला झालाय तरी काय? व्हिडिओ पाहून चाहते काळजीत


Sandip Pathak | कधी गंभीर तर कधी विनोदी व्यक्तिरेखा करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता म्हणजे संदीप पाठक. त्याने मराठी मालिका नाटक असे चित्रपटांमध्ये काम करून त्याची एक वेगळी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात बसवली आहे. संदीप हा सोशल मीडियावर देखील काही प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावर संदीपचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्याच्या मानेला त्याने पट्टा बांधलेला आहे. त्यामुळे आता संदीपला नक्की काय झाले आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

हेही वाचा – ‘हदयी तुमच्याही राम हवा…’; अयोध्येतील मंदिर उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेचं नवं गाणं रिलीज

संदीप सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा चेहरा सुजलेला दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या मानेला एक पट्टा लावलेला आहे. एवढंच नाही संदीपला नीट बोलता देखील येत नाही. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते चांगलेच काळजीत पडलेले आहे. परंतु शेवटी असे लक्षात येते की संदीपला काही झालेले नसून त्यांनी हा एक मजेशीर व्हिडिओ केलेला आहे.

सोशल मीडियावर काही रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या क्या पाना चाहते हो? सक्सेसफुल होना चाहते हो हा डायलॉग तुफान ट्रेण्ड होत आहे. आणि अनेकांनी यावर व्हिडिओ देखील केले आहे. आणि संदीपने देखील याच डायलॉगवर ही रील केलेली आहे.

तरीदेखील त्याच्या मानेभोवती पट्ट्या पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला नक्की काय झाले आहे असा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे.