Amy Jackson : सदगुरु कि लक्झरीगुरु? बॉलिवूड अभिनेत्री ‘या’ भेटीमुळे झाली ट्रोल, पहा फोटो


Amy Jackson meet Sadguru । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इमी जॅक्सन (Amy Jackson) आपल्या अदाकारीमुळे नेहमी चर्चेत असते. इमी इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी विविध पोस्ट करून संपर्कात राहत असते. नुकतेच इमीने सदगुरु (Sadguru) म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांची भेट घेतल्याची पोस्ट इंस्टाग्रामद्वारे शेअर केली. मात्र या पोस्टमुळे इमी चांगलीच ट्रोल झाली आहे. सदगुरु कि लक्झरी गुरु असे म्हणत नेटकऱ्यांनी या पोस्टवर इमीला ट्रोल केले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

इमी जॅक्सन सध्या दक्षिण भारतात चित्रपटाचे शूट करत आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान इमीने कोईमतूर येथे सदगुरु यांची आश्रमाला भेट दिली. या भेटीचे फोटो तिने आपल्या ऑफिसिअल इंस्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केले. मात्र अनेक चाहत्यांनी इमीला या फोटोंवरून ट्रोल केले आहे. यावेळी इमीने सद्गुगुरुंसोबत वेळ घालवताला. तसेच आनंदी, निरोगी मुलांचे संगोपन करण्यापासून ते जगाच्या भावी मानसिक आरोग्य संकटापर्यंत आणि स्वतःसाठी कल्याण वाढवणारे वातावरण तयार करण्याचे महत्त्व या सर्व विषयांवर चर्चा केली.

या भेटीवेळी इमीने अनिता डोंगरे यांनी डिझाईन केलेला कुर्ता परिधान केला होता. आपल्याला अनिताने बनवलेले डिझाइन्स खूप आवडत असल्याचं इमीने म्हटलं आहे. तसेच या भेटीदरम्यान इमीने सद्गुरूंनी मातीच्या संरक्षणासाठी केलेल्या 100 दिवसांच्या टू व्हीलर प्रवासावर गप्पा मारत सद्गुरुनाकडून त्यांचे स्वप्न आणि ध्येय समजून घेतल्याचं इमीने सांगितले.