‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री वरदविनायक बाप्पा चरणी अर्पण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजवर मराठी कलाविश्वात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले. इतिहास म्हटलं कि, पहिले डोळ्यासमोर उभे राहते ती छत्रपती शिवाजी महाजांची प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आजही संपूर्ण मुलुख राजं पुढे नतमस्तक होतो आणि मुजरा करतो. अनेक जण छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त आहेत. आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास विविध माध्यमातून पाहिला वा ऐकला असेल. आता छत्रपती घडविणाऱ्या माय माऊलीचा इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

शुभकार्याची सुरुवात ही कायम श्री गणेशाच्या पूजनाने होते. त्यामुळे आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’चे पहिले पोस्टर श्री वरदविनायक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने या चित्रपटाची घोषणा करताना आई जिजाऊंच्या जयंतीनिमित्त चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येक जण या चित्रपटाबाबत उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहे.

या चित्रपटात संपूर्ण मुलखाला छत्रपती शिवाजी महाराज देणाऱ्या माऊलीच्या स्त्री शक्ती आणि मातृशक्ती चे दर्शन घडणार आहे. 6 बटरफ्लाइज प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे करत आहेत. तर चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका म्हणजेच राजमाता जिजाऊंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारताना दिसणार आहे. या भूमिकेबाबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित स्वतः फार उत्सुक आहे. आनंदासोबत जबाबदारी असल्यामुळे ही भूमिका साकारताना तेजस्विनी फार मेहनत घेत आहे.