हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘झिम्मा 2’, ‘ गोष्ट एका पैठणीची ‘, ‘ बस्ता ‘, ‘ मन फकिरा ‘, ‘ ओले आले ‘ यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री सायली संजीवने अनेक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. त्यामुळे सिनेविश्वात सायली संजीव या नावाचा मोठा बोलबाला आहे. आज तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे. जो कायम तिच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. अशातच सायलीने चाहत्यांना मोठा झटका देणारी पोस्ट शेअर केल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर कायम सक्रिय राहून चाहत्यांशी संपर्क साधणाऱ्या सायली संजीव ने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि याबाबत तिने सोशल मीडियावरच माहिती दिली आहे. सतत वेगवेगळे लूक, फोटोज्, व्हिडिओज आणि कामाचे अपडेट देणाऱ्या पोस्ट शेअर करणारी सायली संजीवने सोशल मीडियावरून ब्रेक घेतल्याचे समजत आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वतःच सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. याबाबत सायली संजीवने अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टमध्ये सायलीने तिचा निर्णय आपल्या चाहत्यांना सांगताना लिहिले आहे की, ‘सोशल मीडियापासून लहानसा ब्रेक घेत आहे. लवकरच परत येईन… लव्ह अँड लाइट’. सायलीची ही इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून प्रचंड चर्चेत आली आहे. दरम्यान सायलीने सोशल मीडियावरून ब्रेक घेतल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. सायलीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरील तिच्या जुन्या पोस्टवर चाहते ‘मिस यु’ अशा कमेंट करताना दिसत आहेत.