‘वंगाळss वंगाळss वंगाळss’; ‘विश्वमित्र’ म्युझिक अल्बमच्या टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| काही दिवसांपूर्वीच मराठी गायक अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘विश्वमित्र’ या नव्या म्युझिक अल्बमची घोषणा केली होती. यानंतर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. `विश्वमित्र’ या अल्बमचे टायटल ट्रॅक गाणे लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा काळे या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या गाण्यात एक प्रेमाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. गाणे जरी रांगड्या मातीतील असले तरी या गाण्यातून दोघांची हळुवार सुरू होणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यांची ही प्रेमाची गोष्ट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.

विश्वमित्र हे टायटल ट्रॅक अवधूत गुप्ते यांनी गायले असून या गाण्याला संगीत आणि बोलही त्यांचेच लाभले आहेत. या गाण्याबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले कि,’आमच्या अल्बममधील टायटल सॉंग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील राकड, रांगडे शब्द लोकांना भावणारे आणि आपलेसे करणारे आहे. गावाकडे सर्रास वापरले जाणारे हे बोलीभाषेतील शब्द गाण्यात एक गावरान तडका आणत आहेत. या गाण्यातून एक कथा उलगडत आहे’.