प्रार्थना बेहरेने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट; रोमँटिक व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले. आज कलाविश्वात तिने स्वतःचे पाय घट्ट रोवले आहेत. प्रार्थानाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. प्रार्थानादेखील या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्रार्थनाने सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच दिग्दर्शक- निर्माता अभिषेक जावकरसाठी एक खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होते आहे.

प्रार्थना बेहरेने तिचा पती अभिषेक जावकरच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे. प्रार्थानाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने अभिषेकसोबतचे काही Unseen रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ही एक व्हिडिओ पोस्ट आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये प्रार्थानाने लिहिलंय, ‘मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए, आँखों मे तुम को भरूं, बिन बोले बातें तुमसे करूँ…अगर तुम साथ हो…अभिषेक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Happy Birthday नवरोबा…आय लव्ह यू’.

प्रार्थनाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर यावर अनेक नेटकरी, चाहते तसेच सिनेविश्वातील बऱ्याच कलाकार मंडळींनी कमेंट करत अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीदेखील प्रार्थनाने अनेकदा नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. विविध पोस्ट शेअर करत प्रार्थना कायम तिच्या नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते. प्रार्थनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका तुफान लोकप्रिय ठरली. या मालिकेनंतर आता लवकरच ती एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.