महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ चित्रपटाला मिळाले ‘एवढे’ पुरस्कार, अभिनेत्याने मानले आभार


2023 मध्ये अनेक मराठी चित्रपट आले. आणि सगळे चित्रपट गाजले देखील त्यातीलच रितेश देशमुख यांचा दिग्दर्शित वेड हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील गाणी, संगीत त्याचप्रमाणे कथा प्रेक्षकांना खूप आवडली. आणि महाराष्ट्राच्या लाडक्या दादा वहिनींना सगळ्यांनी अगदी डोक्यावर घेतले. नुकतेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा पार पडला. आणि या सोहळ्यामध्ये रितेश देशमुख आणि जीनिलीया देशमुख यांना तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत. आणि याबाबत रितेश देशमुख शेअर करून माहिती दिलेली आहे.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या शोमध्ये वेड या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. रितेश देशमुख एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही हातात पुरस्कार दिसत आहे. ही पोस्ट शेअर करून रितेश देशमुख यांनी झी टॉकीज आणि प्रेक्षकांचे देखील आभार मानलेले आहेत.

हेही वाचा – प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट गाणं, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, पॉप्युलर फेस ऑफ द इयर, स्टाईल आयकॉन ऑफ द इयर एवढे पुरस्कार मिळालेले आहेत.

वेड या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकले. त्याचप्रमाणे जीनेलियाने देखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदाच अभिनय केला. त्यांच्या या पुरस्कारानंतर सगळेजण त्यांना कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहे.