Ashwini Mahangde | ‘प्रचंड स्वप्न पहा आणि..’ आश्विनी महांगडेची मोठी खरेदी, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी


Ashwini Mahangde | सध्या आई कुठे काय करते ही मालिका टेलिव्हिजनवर खूप जास्त गाजली आहे. या मालिकेतील सगळी पात्र देखील खूप लोकप्रिय झाली आहे. अशातच यातील अश्विनी महांगडे ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एखाद जागा निर्माण केलेली आहे. या मालिकेतील अनघा नावाची भूमिका साकारत आहे

या मालिकेनंतर तिच्या फॅन्स फॉलोविंगमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. आणि तिच्या आयुष्यातील अनेक घटना शेअर करत असते. अशातच तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे. ते म्हणजे अश्विनीचा मुंबईत स्वतःच घर घेण्याचा स्वप्न साकार झाले आहे. तिला म्हाडाची चावी देखील मिळालेली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ चित्रपटाला मिळाले ‘एवढे’ पुरस्कार, अभिनेत्याने मानले आभार

अश्विनीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काही स्वप्न पूर्ण होतातच. आज एक स्वप्न पूर्ण झालं. अश्विनीची या फोटोवर तिच्या अनेक चाहते कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहे.”

अश्विनी महांगडे हिला म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत कलाकार कोठ्यातून गोरेगावमध्ये घर मिळालेले आहे. आणि तिला तिच्या घराच्या चाव्या देखील मिळालेले आहे. अशाप्रकारे अश्विनीचा मुंबई स्वतःचं घर घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण झालेले आहे.