हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी आपल्या जादुई आवाजाची भुरळ श्रोत्यांना घातली आहे आता आपल्या उत्तम अभिनयाने ते प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘गुड वाईब्स ऑन्ली’ची कथा ही जुगल राजा यांची आहे. दोन व्यक्तींभोवती फिरणारी ही कथा सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली आहे. आता यात नेमकं काय पहायला मिळणार हे वेबफिल्म आल्यावरच कळेल. परंतु नावावरून आणि पोस्टरवरून तरी यात काहीतरी उत्सुकता वाढवणारं पाहायला मिळणार हे नक्की! या वेबफिल्मबद्दल बोलताना दिग्दर्शक जुगल राजा म्हणाले कि, ‘आपल्या आजुबाजुला सतत चांगल्या लहरींचा प्रवाह असेल तर आपले आयुष्य आपसुकच सकारात्मक होते. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या वेबफिल्ममध्ये केला आहे आणि यासाठी आम्हाला प्लॅनेट मराठीची साथ लाभली आहे. याहून चांगलं काही असूच शकत नाही. मला खात्री आहे, हा विषय प्रेक्षकांना आवडेल’.
तर प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख आणि संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, ‘आम्ही नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळे विषय दिले आहेत. या वेबफिल्मची संकल्पनाही खूप वेगळी आहे. सर्फिंग या विषयावर चित्रपट बनू शकतो, ही संकल्पनाच मुळात मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये आपण हा विषय अनेकदा पाहिला आहे. प्रथमच हा विषय मराठी चित्रपटात हाताळण्यात आला आहे’. ‘प्रेमात पडायच्या अगोदर आपण सर्वात आधी त्या व्यक्तीच्या “Vibe” शी connect होतो. मग पुढे ती नुसतीच “मैत्री” राहते की “प्रेम” किंव्हा फक्त “Good Vibes Only”, अशा कॅप्शनसोबत या वेबफिल्मचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. जे पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता हळूहळू वाढू लागली आहे.