हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ या नव्याकोऱ्या चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार पाठमोरे दिसत होते. यानंतर आता चित्रपटातील त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सोशल मीडियावर नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे आणि यामध्ये सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान यांचे फर्स्ट लूक रिलीज झाले आहेत.
या पोस्टरमध्ये सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी नेमकं कोणाच्या गळ्यात मयुरीच्या हातातली वरमाला पडणार..? हे अद्याप गुपित आहे. हे गुपित येत्या १ मार्च २०२४ रोजी उलगडणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
या आगामी चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आणि निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी म्हटले कि, ‘चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की!!’ सोशल मीडियावर हे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे.