Amruta Subhas | मराठी अभिनेत्री अमृता सुभाष मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि अभ्यासू अभिनेत्री आहे. मराठीसोबतीने बॉलीवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप पडलेली आहे. अनेक हुशार कलाकारांच्या यादीमध्ये अमृता सुभाषेचे नाव नेहमीच घेतलं जातं. तिचा खूप चांगला फॅन फॉलोविंग देखील आहे. परंतु अनेकांना माहित नाही की अमृता हीचे खरा आडनाव काय आहे.
अमृता हि तिच्या आडनावाऐवजी तिच्या वडिलांचे नाव लावते. म्हणजेच सुभाष ही तिचे आडनाव नसून तिच्या वडिलांचे नाव आहे. परंतु फार कमी लोकांना तिचे खरे आडनाव काय आहे हे माहित नाही.
अमृता सुभाष हीने संदेश कुलकर्णी याच्यासोबत लग्न केलं. त्या दोघांचे लव मॅरेज आहे. संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे अमृताचं सासरच आडनाव हे कुलकर्णी असे आहे. परंतु माहेरचे आडनाव हे अमृताचे ढेंबरे असे आहे. परंतु तिने तिचे हे आडनाव कधीच लावले नाही ती तिच्या आडनावऐवजी तिच्या वडिलांचे नाव लावते.
एका मुलाखतीमध्ये तिला तिच्या आडनावाबद्दल प्रश्न विचारल्या असतात ती म्हणाली की, “मला माझ आडनाव लावता येत नाही हे माझं हळवं दुखणं आहे. माझा आडनाव ढेंबरे आहे. पण माझं हे आडनाव कुणीही आजपर्यंत नीट उच्चारलेले नाही. कुणी ढगे म्हणतो कुणी ढमढेरे तर कोणी ढोले त्यामुळे आडनाव लावून सोडून दिलं.”
अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने अवघाची संसार, झोका, पाऊलखून यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे श्वास, सावली, हापूस, विहीर यांसारख्या चित्रपटात देखील अमृता सुभाष हिने काम केले आहे.