‘ओढ कमी झाली की..’ कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट; म्हणाला, ‘आपण आपल्या माणसाला…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्य्मातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतोय. शिवाय त्याने शेअर केलेल्या पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. आताही त्याची एक पोस्ट अशीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यावरील संतोष जुवेकरची कमेंट देखील चर्चेत आली आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने स्वतःचा एक मस्त फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये पुन्हा एकदा ‘सुकून’ या नावाने एक सुंदर विचार लिहिला आहे. कुशलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘माणसा माणसातली “ओढ” कमी झाली की नात्यात “ओढाताण” सुरू होते. :- सुकून’. कुशलने अगदी एका ओळीत मांडलेला हा विचार अनेकांना पटल्याचे कमेंट बॉक्समध्ये दिसत आहे.

कुशल बद्रिकेने याआधी देखील ‘सूकून’ या नावाने असे बरेच विचार मांडले आहेत. त्याने लिहिलेल्या या ओली, सुविचार, भावना आणि किस्से हे सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतात. आताही त्याने शेअर केलेली हि पोस्ट इतर पोस्टप्रमाणे व्हायला होताना दिसते आहे. या पोस्टवर कुशलचा खास मित्र आणि मराठी सिनेविश्वातील लाडका अभिनेता संतोष जुवेकरनेदेखील कमेंट केली आहे. त्याने लिहिलंय, ‘म्हणून आपण आपल्या माणसाला ओढून धरून ठेवायचं’. कुशलची हि पोस्ट आणि संतोषची कमेंट दोन्हीही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.