रख विश्वास शिव हैं तेरे पास!! संतोष जुवेकरने घेतलं उज्जैनच्या महाकालाचे दर्शन; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर फार लोकप्रिय कलाकार आहे. त्याने मालिका, चित्रपट आणि सीरिजच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने साकारलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्याचा चाहता वर्ग फार मोठा असून त्याचे चाहते कायम त्याच्याविषयी जाणून घेण्यात उत्सुकता दर्शवतात. एकीकडे अयोध्येत श्री राम मंदिर उदघाटनानंतर भक्तीमय वातावरण झाले असताना दुसरीकडे संतोष जुवेकरने त्याच्या मित्र मंडळींसह नुकतेच उज्जैनच्या महाकाल महादेवाचे दर्शन घेतले आहे.

संतोष जुवेकरने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आपल्या आवडीच्या आणि जिवलग माणसांन सोबत आपल्या आवडीच्या आणि जिवलग देवाच्या दर्शनाला गेलं की आपली प्रार्थना आणि आपला नमस्कार त्याच्या पर्यंत नक्की पोहोचतो कारण सोबत फक्त एकमेकांन बद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम, काळजी आणि सकारात्मकताच असते. जय श्री महाकाल!! जय श्री महादेव!! जय मंगलनाथ!! रख विश्वास शिव हैं तेरेपास!!’ संतोषने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.

अभिनेत्याच्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी, ‘जय काल महाकाल!!’, ‘हर हर महादेव!!’, ‘जय शिव शंभो!!’ अशा कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता संतोष जुवेकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तो नेहमीच विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्याच्या पोस्टवर त्याचे चाहते कायम लाईक आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसतात.