सागरचं अन्नपाणी बंद!! ‘या’ कारणामुळे बापूंनी लेकाला दिली शिक्षा; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचे कथानकं सागर, मुक्ता आणि सईभोवती फिरत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सागर सई समजून भलत्याच मुलीला घरी आणताना दिसला. घरच्यांनी ही मुलगी कोण आहे? विचारल्यानंतर तो भानावर येतो. तोपर्यंत हर्षवर्धन त्या मुलीच्या आईवडिलांना घेऊन सागरच्या दारापर्यंत येतो. यावेळी सागर- मुक्ता त्यांची माफी मागतात आणि सईला घेऊन घरी येतात. हर्षवर्धन मात्र सागरच्या मनात संशय वाढवताना दिसतो. दुसरीकडे, सागर दुसऱ्याच्या मुलीला घेऊन आल्याचे इंद्राला नवल वाटते. त्यामुळे इंद्रा सागरला तो सईचा राग राग का करतोय असं ती विचारते.

दरम्यान मुक्ताही त्याला विचारते की, कोणत्या रागात आहात तुम्ही की तुम्हाला तुमच्यासोबत सई नाहीये, भलतीच मुलगी आहे हे कळलं नाही. सईला काही इजा झाली असती तर..? यावेळी इंद्र मध्ये पडते आणि सागरला टोचून बोलली म्हणून मुक्तालाच ऐकवते. इथे बापू मुक्ताची बाजू घेतात. दरम्यान सागर सर्वांना म्हणतो की, सईला काही झालेलं नाही आणि त्यामुळे न झालेल्या गोष्टीचा दोष मला देऊ नका. मुक्ताला सागरने माफी न मागितल्याचा राग येतो आणि ती स्वातीला विचारते, हा पहिल्यापासून असाच आहे का? तर बापू ‘नाही’ असे उत्तर देतात. म्हणतात, ‘तो आधी असा नव्हता, पण आता हाताबाहेर गेला आहे’. यावर मुक्ता म्हणते, ‘जेव्हा तो पहिल्यांदा असं वागलेला तेव्हाच त्याला शिक्षा द्यायला हवी होती’. बापू तिच्या मताशी सहमती दाखवतात आणि सागरला शिक्षा देण्याचे ठरवतात.

एकीकडे अस्वस्थ सागर ऑफिसला निघून जातो तर दुसरीकडे सई काहीच खात नसल्याने कोळी कुटुंबीय टेन्शनमध्ये असतात. दरम्यान मुक्ता बापूंकडे तक्रार करत म्हणते, ‘सईची भूक सागरमुळे मेली आहे. घरातल्या लहान-मोठ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्यांचा मला तिटकारा आहे. त्याला शिक्षा झाली तरंच त्याचं डोकं ठिकाणावर येईल’. तेव्हा बापू सागरला शिक्षा देतात की, ‘आजपासून सागरचं या घरातील खाणं पिणं बंद. त्याची काम कोणीही करणार नाही. त्याला साधं पाणीही कोणी देणार नाही’.

घरात शिल्लक राहिलेलं जेवणही ते मोलकरणीला घेऊन जायला सांगतात आणि सर्वांना तंबी देतात कि त्यांनी सांगितलेली शिक्षा आज, आता आणि या क्षणापासून सुरू झाली आहे. व्हायरल प्रोमो व्हिडिओत सागरला घरात कोणीच काहीच मदत करत नसतं. स्वाती त्याच्या शर्टला इस्त्रीदेखील करुन देत नाही का त्याला कोणी साधा पेपरही देत नाही. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊन प्रेक्षकांची आगामी एपिसोडबाबत उत्सुकता वाढवतो आहे.