‘इथे मनःशांतीचा प्रवास सुरु होतो..’; मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं केदारनाथाचे दर्शन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी या वाहिनीवरून छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेद्वारे अभिनेत्री विदुला चौगुलेने प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत एंट्री केली. कमी वयात विदुलाने मालिकेच्या माध्यमातून आपल्या अव्वल अभिनयाचे प्रदर्शन केले आणि प्रेक्षकांना आपले कौतुक करायला भाग पाडले. यानंतर विदुलाने मराठी चित्रपटातदेखील काम केले. शिवाय विदुला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे प्रेक्षकांच्या सतत संपर्कात राहताना दिसते. नुकतीच विदुलाने व्हिडीओ पोस्ट शेअर करत केदारनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री विदुला चौघुलेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि व्हिडीओ पोस्ट केली आहे. केदारनाथ मंदिराचे ट्रेक आणि मंदिर परिसरातील विविध फोटो तसेच व्हिडिओ विदुलाने या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. विदुलाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ज्याठिकाणी मनाच्या शांतीचा प्रवास सुरु होतो…’. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नेटकरी, चाहते आणि सिनेविश्वातील काही मंडळींचा देखील समावेश आहे.

एका युजरने म्हटले आहे कि, ‘तुझ्यामुळे आम्हाला केदारनाथचे दर्शन झाले’. तर अनेकांनी ‘जय शिव शंभो’, ‘जय केदारनाथ’, ‘हर हर महादेव’ ‘जय भोलेनाथ’, ‘जय भोलेबाबा’ अशा कमेंट केल्या आहेत. माहितीनुसार, उत्तराखंड येथे तब्बल ३ हजार ५३८ मीटर उंचीवर असणाऱ्या या केदारनाथ मंदिरात सामान्य नागरिक, कलाकार मंडळी आणि अगदी राजकीय नेते मंडळी देखील महादेवासमोर नतमस्तक होतात. विदुलाने जवळपास १६ ते १७ किलोमीटर ट्रेक करत महादेवाचे दर्शन घेतले आहे. या व्हिडिओमागे तिने ‘नमो नमो हे शंकरा’ गाणे जोडले आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.