‘आपल्या नात्यात…’ पूजा सावंतच्या बर्थडेसाठी होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट; कोजी फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री पूजा सावंत आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा वाढदिवस पूजासाठी खूपच खास आहे. कारण येत्या महिन्यात पूजा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे हा वाढदिवस तिच्या लग्नाआधीचा शेवटचा वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त सोशल मीडियावर पूजाचे चाहते आणि मित्र मंडळी खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. मग यामध्ये पूजाचा होणारा नवरा कसा काय मागे राहील बरं..? पूजाच्या होणाऱ्या नवऱ्यानेसुद्धा तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होते आहे.

अभिनेत्री पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असून अलीकडेच त्यांची एन्गेजमेंट झाली आहे. दोघांचं समुद्रकिनाऱ्यावरील रोमँटिक फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होत. त्यांच्या लग्नाला एक महिना उरला असून आज सिद्धेशने त्याच्या लेडी लव्हच्या वाढदिवशी आपल्या भावना व्यक्त करणारी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने दोन फोटो शेअर केलेत. यातील एका फोटोत पूजा केक कापताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत पूजा सिद्धेशच्या मिठीत दिसतेय.

या फोटोंसोबत सिद्धेशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘आजच्या खास दिवशी मी देवाचे आभार मानेल की त्याने आमची भेट घडवली. तू नेहमीच आपल्या नात्यात स्ट्राँग बाँड राहिली आहेस. तुझ्या सुंदर हास्याप्रमाणेच तुझा आजचा दिवस आणि येणारं वर्ष जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह’. सिद्धेशने दिलेल्या या गोड शुभेच्छांवर पूजा सावंतने प्रतिक्रिया देत लिहिलंय, ‘तुझे शब्द… थँक यू सो मच सिड, तुझ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. आपल्या दोघांच्या यापुढील अशाच सुंदर क्षणांची मी आतुरतेने वाट पाहत आहे’. सध्या सोशल मीडियावर सिद्धेशने शेअर केलेले हे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.