काळी माती, हिरवं शिवार!! मराठमोळ्या अभिनेत्रीचा शेतातला व्हिडीओ व्हायरल; हाताने तोडली ताजी कोथिंबीर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतीळ लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. या भूमिकेमुळे विशेष प्रसिद्धी मिळालेली प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. या माध्यमातून ती निरनिराळे फोटो, व्हिडीओ शेअऱ करत चाहत्यांना वेगवेगळ्या अपडेट देत असते. दरम्यान, प्राजक्ताचा शेतात कोथिंबीर कुडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची नाळ तिच्या गावाच्या मातीशी जोडलेली आहे. प्राजक्ताचे कुटुंबीय शेतकरी आहेत आणि त्यामुळे अनेकदा ती गावातील फोटो तसेच व्हिडीओ आणि गावातील आठवणी शेअर करताना दिसते. नुकताच प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या गावातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती शेतात जाऊन कोथिंबीर कुडताना (तोडणी करताना) दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या मामांनी शूट केल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे,

प्राजक्ताने या व्हिडीओत आपल्या शेताची हिरवळ दाखवली आहे. या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘त्याचं झालं असं, आजी म्हणाली कोथिंबिरीच्या वड्या करुयात, मग म्हटलं आणूयात कोथिंबीर शेतात जाऊन. #videoby : आमचे मामासाहेब’. या कॅप्शनसोबत तिने शेतकरी, मराठी मुलगी, बागायतदार, शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतीविषयक असे हॅशटॅग दिले आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलंय, ‘रॉयल शेतकरी’. तर अन्य एकाने म्हटलं, ‘शेतात चप्पल घालायची नसते’.