‘देखा जो तुझे यार..’ गाण्याच्या मराठी व्हर्जनवर रितेश- जिनिलियाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वाची लाडकी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया. या जोडीचे अनेकदा चाहते आहेत. जे त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. त्यामुळे रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. त्यांच्या रिल्स व्हिडीओ आणि फोटो कायम व्हायरल होताना दिसतात. अशातच आता रितेशने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. यात ते दोघेही रितेशच्या ‘दिल में बजी गिटार’ या लोकप्रिय गाण्याच्या मराठी व्हर्जनवर थिरकताना दिसत आहेत.

अभिनेता रितेश देशमुखने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेता रितेश देशमुखचा २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अपना सपना मनी मनी’ या कॉमेडी सिनेमातील ‘दिल में बजी गिटार’ हे गाणं सर्वत्र लोकप्रिय झालं होतं. आजही अनेक समारंभात हे गाणं आवर्जन वाजवलं जात आणि यावर प्रत्येकजण ताल धरताना दिसतो. अशातच आगामी मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या निमित्ताने या गाण्याचं मराठी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मग या गाण्यावर थिरकण्याचा मोह रितेशला कसा आवरणार..?

तब्बल १८ वर्षांनंतर ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘गिटार साँग’ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या मराठी व्हर्जनवर रितेश आणि जिनिलियाने एकत्र ताल धरत हा व्हिडीओ शूट केला आणि शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. काही तासांतच या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. दरम्यान, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.