Akshaya Deodhar – हार्दिकला सोडून अक्षया एकटीच गेली फिरायला; बर्फातले फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Akshaya Deodhar) मराठी अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या माध्यमातून ती कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि रिल्स शेअर करताना दिसते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर अक्षयाचा चाहता वर्ग प्रचंड वाढला. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान लग्नानंतर अक्षया आणखीच चर्चेत येऊ लागली आहे. तिचे आणि हार्दिकचे फोटो, व्हिडीओ कायम व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, लग्नानंतर अक्षया देवधर सिक्कीम मध्ये सुट्या एन्जॉय करायला गेली आहे. इथले काही फोटो तिने शेअर केले आहेत.

Akshaya Deodhar

अभिनेत्री अक्षया देवधरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अक्षया तिच्या मैत्रिणींसोबत सिक्कीमध्ये फिरायला गेल्याचे दिसत आहे. बऱ्याच काळानंतर अक्षया मैत्रिणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (Akshaya Deodhar) हिमालयाच्या कुशीतलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणून सिक्कीम ओळखले जाते. इथे कायम पर्यटकांची गर्दी असते. अशातच अक्षयाने देखील सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी सिक्कीमची निवड केली आहे. अक्षयाने सिक्कीमच्या बर्फात केलेले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सिक्कीमची राजधानी गंगटोकमधील हे फोटो आहेत. या फोटोंना अक्षयाने ‘तेरी इक हसी के बदले… मेरी ये जमीन ले ले…’ असे कॅप्शन दिले आहे. सिक्कीममध्ये अक्षया बर्फाळ वातावरणाचा पुरेपूर आनंद घेत आहे. अक्षयाने सिक्कीममध्ये बर्फवृष्टीचादेखील आनंद घेतला आहे. दरम्यानचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या फोटोंवर पती हार्दिक जोशीने ‘Miss You My Love’ अशी कमेंट केली आहे. यावर अक्षयाने किस आणि हार्ट ईमोजी शेअर केला आहे. (Akshaya Deodhar)