‘या माणसाला भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं…’ मराठा आरक्षणाबाबत अश्विनी महांगडेची ती पोस्ट चर्चेत


अभिनेत्री अश्विनी महांगडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट, मालिकामध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात एखाद्या निर्माण केली आहे. यासोबतच अश्विनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामुळे ती चांगली चर्चा झालेली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण चालू आहे. अनेक बांधव आता मुंबईच्या दिशेने जात आहे. त्याचप्रमाणे आता आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. असे जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या या चळवळीमध्ये अनेक महिला तसेच बंधूंनी देखील सहभाग घेतला आहे. आता या सोबतच अश्विनी महांगडे या त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून तिचा पाठिंबा दर्शवला आहे.

अश्विनी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर मनोज जरांगे पाटील यांचा पुण्यातील एक वायरल फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच तिचे मत व्यक्त केले आहे हा फोटो शेअर करून तिने आंदोलनात सोबत करणे हे माझं कर्तव्य आहे असे म्हणून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “साधं फिरायला जाऊन घरी परत घरी पुढच्या दोन ते तीन दिवस फार दमलं म्हणत काढतोआपण… पण हा माणूस एक भाबडा म्हणावी म्हणावं की वेडा म्हणावं.. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने खरे पणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्न आहे की, आता तरी न्याय मिळेल हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणा प्रती असलेल्या सातत्याने समाजप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला. टिकवला वाढवला म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटतं.”

पुढे तिने लिहिले की, “माझे कलाकार म्हणून काम पाहणाऱ्यांनी माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते बारा बलुतेदार 18 पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही. समाजातील सर्वच घटकांचा समान न्याय मिळावा हेच माझे मत असे अश्विनीने सांगितले आहे.”