‘पण पाऊल पुरत नाही…’ सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील ती पोस्ट चर्चेत


अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम करून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. लवकरच त्याचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या निमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चांगली चर्चेत आलेली आहे.

सिद्धार्थ चांदेकर बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि सई ताम्हणकर दिसत आहे. सई ताम्हणकर आणि तो हातात हात पकडून समुद्रकिनारी चालताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो श्रीदेवी प्रसन्न या त्यांच्या आगामी चित्रपटातील आहे.

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “असं कोणी आहे का ज्याच्या किंवा जिच्यासोबत असं चालायला जाणं टाळू शकत नाही. हातात हात धरायचा आहे पण हिंमत होत नाही. मनातलं त्या क्षणाला सगळं सांगायचे. पण पाऊल पुरत नाही गेली. भांडणं मिटवायची आहेत पण लाटा पुरत नाही. आहे असं कोणी?अजून कोण?” सिद्धार्थ या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे आणि अनेकजण कमेंट देखील करत आहे.

श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून आपल्याला सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. या दोघांची जोडी पहिल्यांदा एकत्र आली आहे. आणि प्रेक्षकांना देखील चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी देखील खूप आवडलेली आहे. हा चित्रपट 2 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.