हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी हि केवळ अभिनय क्षेत्रात कार्यरत नसून विविध व्यवसाय क्षेत्रात उतरली आहेत. यातील अनेक कलाकारांनी स्वतःचे हॉटेल सुरु करत अनेक खवय्यांना वेड लावलंय. यामध्ये अभिनेता निरंजन कुलकर्णी, महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याशिवाय अभिनेत्री अनघा अतुल, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. यातच आता चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचाही समावेश झाला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या श्रेयाने आता अभिनयाबरोबर हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतेच तिने मुंबईतील दादरमध्ये स्वत:चे नवे रेस्टॉरंट सुरु केले आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘द फिश बिग कंपनी’ असे आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रेया बुगडेने तिच्या नव्या रेस्टॉरंटचा उदघाटन सोहळा आयोजित केला होता. मोठ्या भव्य स्वरूपात हा सोहळा पार पडल्यानंतर आता हे हॉटेल खवय्यांच्या सेवेत रुजू झालं आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर आपल्या नव्या रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
श्रेयाच्या रेस्टॉरंटचं ना ऐकून यामध्ये फिश लव्हर्सची चंगळ असणार असे दिसत आहे. आता खवय्यांना माशांचे वेगवेगळे पदार्थ चाखायला एक नवं ठिकाण मिळालं आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. दरम्यान श्रेया बुगडेने नव्या रेस्टॉरंटचं ओपनिंग केल्यानंतर सोशल मीडियावर तिचे चाहते आणि अनेक कलाकार मंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. श्रेयाच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सगळेच आतुर असल्याचे कमेंटमध्ये म्हणताना दिसत आहेत.