Pushkar Jog | ‘मी केवळ माणुसकी हा धर्म मानतो’, मोठ्या वादानंतर पुष्कर जोगने मागितली बीएमसी कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी


Pushkar Jog | अभिनेता पुष्कर जोग हा एक मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम आणि कष्टाळू अभिनेता आहे. सोशल मीडियावर देखील पुष्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुष्करने बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली होती. त्याचप्रमाणे कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. परंतु या सगळ्या प्रकारानंतर पुष्करणी आता महानगरपालिका कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेचे कर्मचारी पुष्कर जोगच्या घरी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करायला गेले होते. त्यावेळी पुष्करने सोशल मीडियावर त्यांच्याबाबत एक टीका केली होती. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “जर त्या कर्मचारी बाईमाणूस नसता तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या.” असे विधान केलं होतं. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.

अनेक सेलिब्रिटींनी या विषयी भाष्य केले. इतकच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र गंभीर स्वरूपाची गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. परंतु आता या सगळ्या प्रकारानंतर पुष्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितलेली आहे.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची ‘या’ लोकप्रिय मालिकेत वर्णी; साकारतेय महत्वाची भूमिका

यावर पुष्करने लिहिले की, “मी रविवारी एक पोस्ट केली हो. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हे सांगण्याचा हेतू होता की, मी केवळ माणुसकी हा धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेले त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे त्यामुळे माझ्या मित्राने ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी.”

अशाप्रकारे पुष्करने उघडपणे पोस्ट करून मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितलेली आहे.