‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर अक्षता पडणार; मेहंदी- संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी नुकतीच लग्नबंधनात अडकली. मुग्धा वैशंपायन- प्रथमेश लघाटे, सुरुची अडारकर- पियुष रानडे, गौतमी देशपांडे- स्वानंद तेंडुलकर , स्वानंदी टिळेकर- आशिष कुलकर्णी या जोडप्यांपाठोपाठ आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

हि अभिनेत्री म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत इरा हे पात्र साकारणारी ऋता काळे. सध्या तिच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत इरा हे पात्र साकारून अभिनेत्री ऋता काळे घराघरांत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या रुताच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये मेहंदी सोहळ्याचे आणि संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या स्टोरीवर हे फोटो पहायला मिळत आहेत. दरम्यान, अभिनेत्री ऋता काळे तिचा बॉयफ्रेंड अभिषेक लोकनरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिषेकसुद्धा मराठी कलाविश्वात कार्यरत आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिषेक लोकनरने अत्यंत फिल्मी स्टाइलमध्ये ऋता काळेला प्रपोज केलं होतं आणि आता ही जोडी लग्न बंधनात अडकते आहे. ऋताचा होणारा पती अभिषेक हा मराठी सिनेविश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याने ‘पंधरवडा’ आणि ‘अनवट’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

यामध्ये ऋता महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकली होती. लग्नासाठी ऋताने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मात्र काही दिवसांनी ती पुन्हा मालिकेत झळकेल असे बोलले जात आहे.