शिवानी सुर्वे झाली मिसेस ननावरे!! काल गुपचूप साखरपुडा केला, आज लग्नाचा बार उडवला; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारी २०२४ रोजी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला. सोशल मीडियावर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला.

यानंतर त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु असताना नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील समोर आले आहेत. अखेर शिवानी अजिंक्यची झाली असून ठाण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा आज १ फेब्रुवारीला पार पडला.

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे गेली बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेर आज हि जोडी अधिकृत बंधनात अडकली असून मिस्टर आणि मिसेस झाले आहेत. त्यांच्या लग्नाला बिग बॉस मराठी फेम माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे असे अनेक कलाकार उपस्थित होते.

शिवाय ‘झिम्मा २’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट शिवानीच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहिली होती. दरम्यान या जोडप्याने लग्नासाठी पारंपरिक तर रिसेप्शनसाठी वेस्टर्न लूक केला होता. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो- व्हिडिओंमध्ये अजिंक्यने घोड्यावर बसून लग्नमंडपात एन्ट्री घेतल्याचे समोर आले आहे. दोघेही एकमेकांसोबत परिपूर्ण दिसत आहेत. या जोडीवर नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांची लव्ह स्टोरी ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली. पुढे त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. २०१७ पासून ते एकत्र होते आणि अखेर आज लग्नबंधनात अडकले आहेत.