‘स्वतःला बाहेर खूप शोधलं, आता..’; सुबोध भावेच्या ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक विविध भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. अत्यंत गुणी अभिनेता म्हणून सुबोध भावेच्या नावाचा उल्लेख केला जातो. सिनेविश्वात आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोध भावेचेदेखील नाव आहे. त्याचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सुबोधच्या नव्या प्रोजेक्टविषयी त्याचे चाहते नेहमीच आतुर असतात. सध्या सुबोधचा एक फोटो आणि त्यासोबत त्याने लिहिलेले कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सुबोध भावे सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आताही त्याने अशीच एक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुबोध भावेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केलाय. ज्यात तो गाडीत बसलेला दिसत आहे. शिवाय त्याने लाल रंगाचे टीशर्ट, गळ्यात ब्लूटूथ इअरफोन, डोक्यावर गूगल लिहिलेली काळी टोपी परिधान केली आहे. तर त्याच्या चेहऱ्यावर गहन विचारात बुडाल्याचे भाव दिसत आहेत. या फोटोसोबत सुबोधने एक कॅप्शन लिहिले आहे. ज्यात तो म्हणतोय कि, ‘स्वतःला बाहेर खूप शोधलं, आता जरा स्वतः मध्ये शोधतो’.

सुबोध भावेचा हा फोटो आणि त्यावरील कॅप्शन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट शेअर केल्या आहेत. एका युजरने या फोटोवर कमेंट करताना लिहले आहे कि, ‘गुगलची टोपी घातली आह़े तर शोधायला वेळ लागणार नाही आणि शोधता शोधता नवीन सिमेमाच नवीन पात्र सापडेल जे बघायला प्रेक्षक नेहमीच आतुर असतात’. आणखी एकाने लिहले आहे कि, ‘सुंदर फोटो आणि कॅप्शन’. तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘आत्मनिरीक्षण करावसं वाटणं … हीच खूप मोठी गोष्ट आहे’. अन्य एका युजरने म्हटले, ‘वा भारी झकास फोटो विचाराधीन मुद्रा.., असाच विचार करता करता स्वतःमध्ये स्वतःला शोधाल झकास दिसत आहात गुगल वाली टोपी गळ्यात हेडफोन्स’. अजून एकाने लिहिलं, ‘शोधत रहा आणि काय काय नवीन गवसतं ते शेर करत रहा… बाकी स्वतःला शोधतानाची ही विचारी मुद्रा खूपच मस्त… एकदम कडक दिसतोयस.. नेहमीसारखाच’.