मनात गुदगुल्या, अंगावर शहारे अन ताजा ताजा ‘गारवाsss’; सोनाली- फुलवाचे मनमोहक नृत्य प्रदर्शन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच सोनालीचा ‘डेट भेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला अपेक्षेइतका उदंड प्रतिसाद मिळत नसला तरीही सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीप्रमाणे चर्चेत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगला वाईट प्रसंग, अनुभव, नवनवे लूक आणि व्हिडीओ ससोहळ मीडियावर शेअर करून सोनाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच सोनालीने तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरसोबतचा एक व्हिडीओ शेअर करून सर्वाना आपल्या नृत्यकलेने मोहित केले आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर दोघी मैत्रिणी अनेकदा एखाद्या गाण्यावर डान्स व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी लंडन ब्रिजवर बनवला होता. यानंतर आता थेट बांद्रा वरळी सी लिंक बॅकग्राऊंडला घेऊन त्यांनी ‘गारवा’ या लोकप्रिय गाण्यावर आपल्या नृत्य कलेचे प्रदर्शन केले आहे. हा व्हिडीओ दोघीनींही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनाली आणि फुलवा यांनी अतिशय सुंदर ड्रेस परिधान केले आहेत आणि त्यांच्या नृत्यातील एकसंगता आपले लक्ष वेधून घेत आहे. गायक मिलिंद इंगळे यांच्या ‘गारवा’ या गाण्याला तब्बल २५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने या दोन मैत्रिणींनी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘या गाण्याच्या, अल्बमच्या गेली अनेक वर्ष प्रेमात आहोत… त्याचा गारवा आजही, तसाच जाणवतो, ताज़ा ताज़ा… थंडगार, आजही मनात गुदगुल्या होतात, अंगावर शहारे येतात… या गाण्यांवर नाचत, गात, आज अनेक पावसाळे अनुभवलो, जगलो.. आज “गारवा” ला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आमच्याकडून हे एक छोटंसं tribute टू गारवा.. मिलिंद इंगळे किशोर कदम (सौमित्र) आणि संपूर्ण टीम.. पब्लिक डिमांडमुळे लंडन ब्रीजनंतर थेट बांद्रा- वरळी सीलिंक पार्श्वभूमीवर’. सोनाली आणि फुलवाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.